जळगाव;- जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी मिलींद काळे यांनी सर्वप्रथम कोरोनाची लस घेतली . आज सकाळी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाच्या लसीच्या सुरू झालेल्या ड्राय रनमध्ये काळे यांना सर्वात पहिल्यांदा लस देण्यात आली. कोविडची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून कुणीही न घाबरता लस घेण्याचे आवाहन मिलींद काळे यांनी याप्रसंगी केले. तर, श्री काळे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दरम्यान, काळे यांच्यानंतर मेडिकल कॉलेजमध्ये अन्य कोरोना योध्द्यांना ही लस देण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व सिव्हील सर्जन डॉ. एन.जी. चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती .







