जळगाव ;- जुन्या भांडणाचा वाद उकरून एका तरुणावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याची घटना ६ रोजी उघडकीस आली असून एकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दक्खळ करण्यात आला आहे.
याबाबत माहिती सूत्रांनी दिलेली अशी की, चटई कंपनीत कामाला असणारे सुशिल विनोद कोळी (वय-१९) रा. तुळजाईनगर कुसुंबा हे शनिवारी ६ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बाहेर गेले असता . गावातील प्रशांत सुनिल पाटील (रा.कुसुंबा) याच्या घरासमोरून जात असतांना जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून प्रशांतने त्याच्या घरातून कुऱ्हाड आणुन थेट सुशिलवर हल्ला चढवला. सुशिलच्या पाठीवर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुशिल याला परिसरातील पंकज कोळी व अविनाश पाटील या तरुणांनी सोडवले. यानंतर जखमी सुशिल याला डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सुशिलने दिलेल्या फिर्यादीवरुन प्रशांत पाटील याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संतोष सोनवणे तपास करीत आहेत.