अमळनेर : नगरपरिषद येथे झालेल्या विशेष ऑनलाईन सभेत कोणतीही करवाढ न करता १३५ कोटी रुपयांच्या ५ व्या अर्थसंकल्पास मंजुरी प्रदान करण्यात येवुन २ कोटी ४४ लाख रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली.
सन २०२०-२१चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०२१-२२ चे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या मध्ये आपल्या सर्वाना माहित आहे की, साल सन २०२०-२१ मध्ये कोविड-१९ या सारख्या महामारीचा पादुभाव झाला. बऱ्याच हालाकीच्या परिस्थिचा अमळनेरकरांनी सामना केला नभुतो नाभविष्यती असा संसर्ग सर्वानी अनुभवला आणि नेमका मार्च २०२० ला लॉकडाऊन लागल्यामुळे मालमत्ता कर वसुली वर देखील परिणाम झाला. अत्यंत कमी उत्पन्नामध्ये न.पा.ने या महामारीवर उपाययोजना केली. या सर्व परिस्थितीमध्ये आ.अनिल पाटील, मा.आ कृषिभूषण साहेबराव पाटील, उपनगराध्यक्ष, विरोधीपक्ष नेते, सभापती, सर्व सदस्य तसेच सर्व प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी आणि पत्रकार बंधु-भगिनी, सर्व सामाजिक संस्था यांनी सहकार्य केले. त्यासर्वाचे आभार व यापुढेही आपले सहकार्य लाभेल ही अपेक्षा.
अमळनेर नगरपरिषद अर्थसंकल्पाची ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या सभेचे पिठासन अधिकारी म्हणून जिजामाता कृषिभुषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा यांनी कामकाजास सुरुवात केली. मा मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांचे उपस्थित लेखापाल चेतन गडकर यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. सादर अर्थसंकल्पात महसुली जमा रक्कम रुपये ५४ कोटी १२ लाख, महसुली खर्च रक्कम रुपये ५४ कोटी १२ लाख, भांडवली जमा
रक्कम रुपये ८० कोटी ८७ लाख, भांडवली खर्च रक्कम रुपये ७८ कोटी ४३ लाख सह रक्कम रुपये २ कोटी ४४ लाख शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. या मध्ये विशेषत: कोणतीही करवाढ प्रस्तावित नसुन आहे त्याच करामधुन जास्तीत जास्त वसुलीवर भर देवुन प्राप्त निधीतुन कामे प्रस्तावित केलेली आहे. महाराष्ट्र सुर्वण जयंती नगरोत्थान योजनेतुन भुयारी गटारचे योजनेचे काम डिसेंबर २०२१ पर्यत पुर्ण करुन घेण्याचा मानस आहे. तसेच शहरातील भुयारी गटार प्रकल्प सुरु कार्यालय असलेल्या कामाची लांबी फक्त ७० किमी असून शहरातील एकुण रस्त्यांची लांबी १६० किमी असल्याने उर्वरित ९० किमीचे सर्वेक्षण झाले असुन वाढीव प्रकल्प आराखडा शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला आहे. तसेच शहरासाठी कपिलेश्वर, निम, अथवा कलाली येथुन २४ तास पाणीपुरवठा करणे कामी पुढील ३० वर्षाचा आराखडा तयार करुन शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. आरोग्य व पाणी पुरवठा या सुविधेवर भर देण्यात येणार आहे. या सोबतच भुयारी गटार योजनेमुळेचे रस्ते खराब झालेले आहे. ते दुरुस्ती करिता शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. असे लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील यांनी सांगितले आहे.