मुंबई – दक्षिण मुंबईत नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री 8 वाजता अचानक आग लागली असून, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दरम्यान एक अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. आगीदरम्यान मॉलमध्ये सुमारे 200 ते 300 जण उपस्थित होते. मुंबई पोलीस आणि मुंबई अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व जणांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
सोबतच बाजुची इमारत सुद्धा खाली आली असून त्यामधून सुमारे 3500 जणांनी सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. मॉलला आग लागून सुमारे 12 तास उलटले असून ही, अजूनही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलेले नाही. घटनास्थळी 24 अग्निशमन दलाच्या गाड्या, 16 जम्बो टॅंकर आणि 250 अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहे. या आगीच कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.