जळगाव (प्रतिनिधी) – युवा विकास फौंडेशन, सरदार वल्लभभाई पटेल बहु. विकास संस्था, व रोटरी क्लब ऑफ
जळगांव सेंट्रल जळगांव यांच्या तर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंती निमित्त
कोरोना योद्वा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हयाचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन द्विपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरवात केली.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एम. एस. सर्जन माजी अध्यक्ष (IMA) चे डॉ.ए.जी भंगाळे, आ. राजुमामा भोळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, डॉ.स्नेहल फेगडे एम एस सर्जन/ प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय लेवा विकास महासंघ जळगांव, मा रो. अपर्णा भट कासार अध्यक्षा, रोटरी क्लब ऑफ जळगांव सेंट्रल, डॉ. करीम सालार माजी उपमहापौर, सुनिल खडके नगरसेवक, डॉ. वैभव खर्चे, डॉ. केतकी पाटील, प्राचार्य डॉ. प्रशांत वारके प्राचार्य गोदावरी मॅनेजमेंट कॉलेज, चंदन महाजन, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते. कोरोनासारख्या जागतिक संकटामध्ये संपूर्ण जग एकजुटीने लढत आहे.
अशा कठीण परीस्थितीमध्ये ज्यांनी स्वत:च्या आरोग्याची कुठलीही तमा न बाळगता प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालुन अहोरात्र रूग्ण सेवा करून त्याग समर्पण व धैर्य यांचा मुर्तीमंत आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. त्यांच्या या मानवतेच्या कार्याचा गौरव म्हणून कोरोना योद्वा हा सन्मान मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, आदींचा यांचा सन्मान करण्यात आला.
ना.गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सामान्य माणसाचा विश्वास देवानंतर डॉक्टरांवर ठेवतात कोरोना काळात जीव धोक्यात घालुन डॉक्टरांनी उपचार केले सर्वाचे कौतुक करावे राज्य सरकारने कर्ज घेतले पण कोविडच्या सुविधा पुरवल्या सरकारने कोणत्याही गोष्टी कमी पडू दिल्या नाही ६ ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध होते. आज १०० ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून दिलेले आहेत व सर्व डॉक्टरांचा गौरव केला. सुत्रसंचालन प्रा. निलेश चौधरी यांनी केले तर आभार डॉ. अपर्णा भट यांनी मानले. याप्रसंगी ललित महाजन, धनंजय तळेले, महेश पाटील ग.स. संचालक, महेंद्र पाटील, राजेश वारके, जितेंद्र बर्डे, विवेक महाजन, प्रा.निलेश पाटील, शैलेश काळे, चेतन पाटील निलेश चौधरी, विलास नेहते, सुनिल पाटील, लक्ष्मीकांत झांबरे, भुषण चौधरी, सचिन पाटील, अँड. नेमचंद येवले, हरीष येवले, उज्वल पाटील, विशाल काळे, सागर सरोदे, रोहीत भोळे, हर्षल चौधरी, जितेंद्र पाटील, ललीत चौधरी, सोहम भोळे, सोहम पाटील, आदि. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतली.







