जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात उद्या दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता १०७ ऑक्सिजन बेड्चे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते केले जाणार आहे.
कोरोना साथरोगाच्या काळात कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेडची नितांत आवश्यकता जाणवत होती. हि गरज लक्षात घेता रोटरी क्लब जळगाव सेंट्रल आणि सदा-ज्ञान फोंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णालयात ऑक्सिजन बेड उभारण्यात आले आहे. यामध्ये एक ७६ खाटांचा व दुसरा ३१ खाटांचा असे एकूण १०७ ऑक्सिजन बेड रुग्णसेवेसाठी तयार झाले आहे. याचे सोमवारी २८ रोजी पालकमंत्री लोकार्पण करणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प.चे सीईओ डॉ.बी.एन. पाटील, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.