जळगावात एकावर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत धारदार वस्तूने वार करून छातीवर दुखापत केल्याची घटना जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप काळू राठोड (वय- २०, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या परिसरामध्ये राहणारा जय उर्फ महाकाल (रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) हा गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता संदीप राठोड याला सोबत बाहेर चाल असे सांगितले. त्यावेळी संदीप राठोड यांनी नकार दिला, त्या कारणावरून जय उर्फ महाकाल याने हातातील धारदार वस्तुने वार करून छातीवर गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. घटनेबाबत शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी जय उर्फ महाकाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहे.