अमळनेर तालुक्यात दहिवद गावात घडली घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील दहिवद गावात मस्करी केल्याच्या कारणावरून एका तरुणाला ४ जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
समाधान दशरथ जोगी (वय १८, रा. दहिवद ता. अमळनेर) हा तरुण परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान शनिवारी दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गावातील शनी मंदिराच्या जवळ उभा असताना त्याने गावातील काही जणांची मस्करी केली. या मस्करी केल्याच्या रागातून गावात राहणारे करण अण्णा भील, रोशन बापू भील, समाधान बापू भील, आणि मुकेश राजू भील या चार जणांनी शिवीगाळ करून समाधान जोगी याला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये समाधान हा गंभीर जखमी झाला. दरम्यान या घटनेसंदर्भात रात्री अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय भोई हे करीत आहे.