यावल ( प्रतिनिधी ) – फैजपुर ते यावल रोडवरील भाग्यश्री हॉटेलजवळ दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून हॉटेलमधील खुर्ची मारून एकाला जखमी केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. रात्री एकावर यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
फकीरा रामा जावरे (वय-५५ , रा. मेन रोड यावल) हे मंगळवारी दुपारी फैजपूर ते यावलरोडवरील भाग्यश्री हॉटेलजवळून जात असताना संशयित आरोपी समाधान प्रभाकर कुंभार (रा. यावल) हा दारूच्या नशेत फकीरा जावरे यांना फकीऱ्या या नावाने चिडवत होता. याचा जाब विचारला असता समाधान कुंभार याने हॉटेलमधील खुर्ची उचलून फकीरा जावरे यांच्या डोक्यात टाकली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रात्री फकीरा जावरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात समाधान कुंभार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास स फौ नेताजी वंजारी करीत आहेत.