जामनेरात पत्रकारांना दिली माहिती
जामनेर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारकडून १ जुलै पासून अंमलात आलेल्या नवीन कायद्यासंदर्भात नागरिकांमध्ये माहिती, जनजागृती व्हावी यासाठी जामनेर पोलीस ठाणे येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरात १ जुलै पासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यानुसार काही कलम हटवण्यात आली असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहे.
कायद्यांमध्ये नवीन कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीने मोठे बदल होणार आहेत. याबाबतची कार्यवाही व माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पत्रकारांना दिली. १ जुलै पूर्वी नोंदवलेल्या खटल्यावर आणि खटल्यांच्या तपासावर नव्या कायद्याच्या कोणताही परिणाम होणार नाही. तसेच १ जुलैपासून नवीन कायद्यानुसार सर्व गुन्हे यांची नोंद केली जाईल. कोर्टामध्ये जुन्या खटल्याची सुनावणी जुन्या कायद्यानुसार होईल.
नवीन कायद्याच्या कक्षेमध्ये नवीन प्रकारची चौकशी आणि सुनावणी केली जाईल. गुन्ह्यासाठीची प्रचलित असलेले कलम आता बदलण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालय, पोलिस प्रशासनाला नव्या कलमाचा अभ्यास करावा लागणार आहे. यावेळी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे, उपनिरीक्षक दीपक रोठे, निलेश घुगे, तुषार पाटीलसह जामनेर पोलीस स्टेशन येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.