जळगाव ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवासी ४८ वर्षीय बौद्ध भिक्खूने हिंगोली येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. अनिल उर्फ जितू तायडे असे मृताचे मूळ नाव असून गुनानंद धम्मरत्न अशी त्यांची ओळख होती.
जितू तायडे या बौद्ध भिक्खूनी हिंगोलीतील गांधी चौकात साई लॉजमध्ये दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिस तपास करत आहे. गुनानंद धम्मरत्न यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर किनगावात सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.