किनगाव ता.यावल (प्रतिनिधी) – येथील आत्माराम नगर मध्ये काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कलुप तोडून घरातील सोन्याचांदीच्या दागीन्यासह पाच लाख रुपयांच्या विविध ठेवीच्या पावत्या घेवून पोबारा केला आहे.
डिंगबर वामन पाटील सेवानिवृत्त वायरमन हे दि. ५ ऑक्टोबर रोजी पुणे येथे त्यांचा मुलगा देवानंद डिगंबर पाटील आणि नितीन डिगंबर पाटील यांच्याकडे गेले होते.त्यांच्या शेजारील ढाके यांनी फोन करून तुमच्या घरात चोरी झाली असल्याची माहीती दिली ,डिगंबर पाटील यांना माहिती मिळताच तात्काळ किनगाव गाठले .घरातील गोदरेज कपाटातीत लॉकरमध्ये ठेललेले प्रत्येकी पाच ग्रॅम सोन्याच्या चार अंगठया किमत पन्नास हजार रुपये , ३७ हजार रुपये किमतीची१५ ग्रॅम सोन्याची पोत सोबत पदक , १२ हजार५०० रुपये किमतीची पाच ग्रॅम सोन्याची लहान मुलाची चैन, २५ हजार रुपये किमत असलेली डिस्को साईजची मनी पोत, आणि४ लाख रुपयांच्या स्टेट बँकेतील मुदत ठेवीच्या पावत्या तसेच जेडीसीसी बॅकेच्या १ लाख६ हजार रुपये किमतीच्या मुदत ठेवीच्या पावत्या असा एकुण पाच लाख ६ हजार रुपयांच्या ऐवज आणी सुमारे ६ हजार रुपये रोख चोरून नेल्याची फिर्याद यावल पोलिसात दाखल केली असुन , यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी तात्काळ किनगाव येथील चोरी झालेल्या निवासस्थानी भेट देवून संपुर्ण घरफोडीच्या घटनेची सविस्तर चौकशी करून पंचनामा केला असुन डिगंबर वामन पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.