जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील किनगाव येथील वृध्दाच्या खून प्रकरणी त्यांच्याच सुनेसह एका तरूणाला पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. सततच्या शरीरसुखाच्या मागणीस कंटाळून सुनेने बहिणीचा मानलेला मुलासोबत हा खून केल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे.
तालुक्यातील किनगाव येथील ट्रकचालक भीमराव शंकर सोनवणे (वय ६०) यांचा काल मृतदेह किनगाव चुंचाळे रस्त्यावरील नाल्याचे पुलाखाली शुक्रवारी आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयीत म्हणुन वृद्धाच्या सुनेसह एका व्यक्तीस अटक केली आहे. विनोद भिमराव सोनवणे यांनी यावल पोलीस ठाण्यात खून झाल्याची फिर्याद दिली होती . याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे जावेद उर्फ जय अली शाह यांचा वरणगाव, भुसावळ येथे शोध घेतला. अखेर तो उदळी गावी आला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
त्याची कसून चौकशी केली असता हा खून त्याने मयत भीमराव यांच्या सून मीनाबाई विनोद सोनवणे (वय ३०) यांच्या सांगण्यावरून केला असल्याचे सांगितले. मीनाबाई हिस ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. तिने, मयत सासरा भीमराव हा सतत शरीरसुखाची मागणी करीत असल्यामुळे उदळी येथील बहिणीने मानलेला मुलगा संशयित आरोपी जावेद शाह अली शाह, (वय २८, रा. वरणगाव ह.मु. उदळी ता. रावेर) याच्या मदतीने सासरे भिमराव सोनवणे यांचा धारदार हत्याराने निर्घृण खुन केल्याचे तपासात सांगितले आहे.