यावल ( प्रतिनिधी ) ;-तालुक्यातील किनगाव येथे कटरखाली कापला गेल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली असून सोपान शंकर मिस्त्री वय ३५ असे मयत तरुणाचे नाव आहे . आज सकाळी सोपान शंकर मिस्त्री हा काम करीत असतांना कटर त्याच्या उजव्या मांडीला कापून गेल्याने त्याच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याला किनगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे सीएमओ डॉ. अहिरे यांनी मृत घोषित केले. याबाबत पोलिसात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते.
मयत हा अविवाहित असून त्याला आई वडील नसल्याचे सूत्रांनी सांगितले.








