सावदा पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- सावदा येथील आयशर चालकाच्या बेपत्ता झाल्यानंतर खून झाल्याचे उघडकीस आल्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी एक संशयित अटक तर दोन फरार झाले होते. या फरारपैकी आणखी एका संशयीताला औरंगाबाद येथून तीन वर्षानंतर अटक करण्यात यश आले आहे.
सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोदा खुर्द ता. रावेर येथील रहीवाशी नामे- याकुब गयासोद्दीन पटेल हा त्याचे मालकीची आयशर कंपनीची मालट्रक (क्र.MH.19.CY.6843) हिचे सह बेपत्ता झाला होता. म्हणुन त्याच्या पत्नीने याकुब गयासोद्दीन पटेल हा मिसींग झाल्याची तक्रार सावदा पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. सदर तक्रारीची चौकशीअन्ति शिताफीने तपास करुन मिसींग इसमाचे अपहरण करुन खून झाल्याचा उलगडा झाला होता. त्यावर सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणेत आला होता.
सदर अपराधाचे तपासात संशयित आरोपी ऋषीकेश उर्फ माधव विठ्ठलराव शेजवळ रा.डावरवाडी औरंगाबाद यास सावदा पोलीसांचे पथकाने अटक केली होती. अपराधातील दोन संशयित राजेंद्र जगन्नाथ डेंगळे, संजय क्षीरसागर हे पसार झालेले होते. तपासाअंती सदर अपराधाचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणेत आले होते. सन २०२१ पासून उपरोक्त अपराधातील दोन संशयित हे पसार झालेले होते व ते वेळोवेळी त्यांचा ठाव ठिकाणा बदल करीत असल्याने त्यांना पकडणे जिकीरीचे झाले होते.
सहा. पोलीस निरीक्षक जालींदर पळे, सहा. पोलीस निरी. निलेश वाघ यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस उपनिरीक्षक- विनोद एम. खांडबहाले, पोहेका. संजीव चौधरी, पोना. सुनिल सैंदाणे, पोना. निलेश बाविस्कर यांचे स्वतंत्र पथक नेमुन संशयिताचे शोधार्थ पाठवले व सदर पथकाने गोपनीय बातमीचे आधारे तिन वर्षा पासुन पसार असलेला संशयित- संजय भुजंगराव क्षीरसागर रा. सिडको, औरंगाबाद यास मोठ्या शिताफीने अटक करुन जेरबंद केले आहे.