जळगाव शहरातील राज मालती नगर येथील घटना, शासकीय रुग्णालयातही एकाला मारहाण
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील राजमालती नगरामध्ये आपापसातील जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहेत. दुसरीकडे शासकीय रुग्णालयात देखील एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने तो देखील जखमी झाला आहे. घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. शहर पोलीस स्टेशन घटनेचा तपास करीत असून शासकीय रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सिद्धार्थ माणिक वानखेडे (वय ३६ रा.राज मालती नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुले असा परिवार आहे. मजुरी काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याचे यापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. (केसीएन)दरम्यान, ऐन मतदानाच्या दिवशी बुधवारी जळगाव शहरातील राज मालती नगर परिसरात दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्यात वाद झाले. वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे.
यामध्ये सिद्धार्थ माणिक वानखेडे यांच्या छातीवर आठ ते दहा जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर यामध्ये विशाल अजय सुरवाडे (वय-२८), जानू संजू पटेल (वय-२०), फैजान राजू पटेल (वय-२४) आणि मेहमूद हाजी बिस्मिल्ला पटेल (वय-४२, सर्व रा. राजमालती नगर) हे सर्व जखमी झाले आहे. (केसीएन)जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून सिद्धार्थ वानखेडे याला मयत घोषित केले. या प्रकरणातील ७ ते ८ जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातदेखील अजय पांडुरंग सुरवाडे (वय ४५) यांना बेदम मारहाण करण्यात आली. काही लोकांनी सोडवासोडव करून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. (केसीएन)त्यामुळे या घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, शनिपेठचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह स्टाफ रुग्णालयात दाखल झाला आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे कामदेखील सुरू होते