जळगाव ( प्रतिनिधी ) वृद्धाच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करून त्याचा खून केल्यानंतर अंगावरील सोन्याचे दागिने व रोकड घेऊन पोबारा करणाऱ्या दोघांच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यांना ३ दिवसांची कोठडी मिळाली आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि,
२९/०१/२०२१ रोजी दुपारी १२:३० वाजेपासुन ते दि. १ जानेवारी १२ वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने फिर्यादी राकेश चांगो झोपे यांचे वडील चांगो रामदास झोपे वय ६९ वर्षे यांना अज्ञात कारणसाठी डोक्यावर कोणत्या तरी वस्तुने गंभीर दुखापत करुन जिवे ठारमारुन मयताचे अंगावरील सोन्या चांदीचे ऐवज सुमारे १,६२,४००/- रुपये किमतीचें त्यात ०३ सोन्याच्याअंगठया एक १० ग्रॅम वजनाची , दोन प्रत्येकी ” ५ ग्रॅम वजनाच्या , २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट ,
एक चांदीचा व दोन सोन्याचे दात असे काढुन खिरोदा ते पाल जाणारे राजमार्ग क्र.९७ चिचाटी शिवारात रोडचे पुर्वेस दरीत निर्जजस्थळी फेकुन दिले होते त्या अनुषंगाने सावदा पोलीस स्टेशन भाग -५ गुरन. ११/२०२१ भादवि.क.३०२, ३९२, २०१ गुन्हा दाखल करण्यात आला होता.
“सदर गुन्हयांचे ओळखुन पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे,अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, $)ए0) मुक्ताईनगर विवेक लावंड अशांनी सदर गुन्हयांचे तपास करणे कामी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, सावदा पोलीस स्टेशनचे सहायक
पोलीस निरीक्षक डी.डी.इंगोळे व वरणगाव पोलीस स्टेशचे सहायक पोलीस निरीक्षक.संदीपकुमार | सांळुखे यांचे पथक तयार करुन तपास करणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षककिरणकुमार बकाले, सावदा पोलीस स्टेशनचे सहायक ‘ पोलीस निरीक्षक .डी.डी.इंगोले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक, सावदा पोलीस स्टेशन कडील पथक अशाना तात्काळ पोलीस अधीक्षक .डॉ.प्रविण मुंढे,अपर पोलीस अधीक्षक जळगाव चंद्रकांत गवळी, विवेक लावंड यांनी दिलेल्या सुचनानुसार तपास चक्रे फिरवुन फिर्यादीचा मित्र असलेला शेख समीर झेख कदीर वय – ३२ वर्षे , २) शेख जावेद शेख खलील वय – ३२ वर्षे दोन्ही राहणार खिडकी मोहल्ला , वरणगाव ता.भुसावळ जि.जळगाव यांना ताब्यात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन गुन्हयाचा घटनाक्रम सांगीतला. त्यांना गुन्हयाचे तपासकामी पोलीस कस्टडी रिमांड मिळणे कामी आज मा.प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सो, रावेर कोर्ट यांचे कडेस हजर केले असता ३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे








