टाकळी प्र.चा. गावातील घटनेमुळे खळबळ
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील टाकळी प्र.चा. गावात उघडकीस आली असून पोलिसांनी सासऱ्याला अटक केली आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सासर्याला अटक करण्यात आली आहे.
उत्तम पुंजाजी चौधरी (वय-५६) रा. शिवशक्ती नगर, टाकळी प्रचा ता. चाळीसगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर कविता गोकुळ चौधरी (वय-२५) मयत महिलेचे नाव आहे.
उत्तम चौधरी (हे सून कविता चौधरी यांच्यासह राहत असून ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता उत्तम चौधरी व सून कविता चौधरी यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाला. या वादातून उत्तम चौधरी यांनी संतापाच्या भरात सून कविता चौधरी हिचा गळा, नाक व तोंड दांबून तिला जीवे मारून खून केल्याचा प्रकार घडला . या बाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात उत्तम याने स्वतः हजर राहून खुनाची कबुली दिली . चाळीसगाव पोलिसांनी संशयित आरोपी उत्तम चौधरी याला अटक केली असून त्याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहे.