जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील खूबचंद सागरमल विद्यालयातील पंखा, कॅमेरे असा १५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी तरुणावर जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल लक्ष्मण जोगी (वय ३९) हे खूबचंद सागरमल विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. त्यांनी याबाबत फिर्यादी दिली आहे. शुक्रवार दि. १४ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शाळेतील ६ हजार रुपये किमतीचे ६ सिलिंग फॅन, ४ हजार ८०० रुपयांचे पांढऱ्या रंगाचे गोल आकाराचे चार सीसीटीव्ही कॅमेरे, ५ हजार १०० रुपयाचे सीपी प्लस कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची केबल असा एकूण १५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल संशयित आरोपी लखन राजू कोसले (रा. गेंदालाल मिल, जळगाव) याने शाळेच्या लोखंडी गेटवर चढून छोट्याशा गॅपमधून घुसून शाळेच्या आवारातून चोरून नेले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.(केसीएन)यावरून जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल किशोर निकुंभ हे तपास करीत आहेत.