रावेर ( प्रतिनिधी ) – खिरोदा येथे पोलीस महानिरीक्षकांचे पथक आणि सावदा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांसह दोघांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
सावदा पोलीस स्थानकाच्या हद्दीत खिरोदा गावातल्या बसस्थानक परिसरातील एका हॉटेलच्या समोर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरिक्षकांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. पथकातील ए. एस. आय. बशीर तडवी व हे कॉ राजेंद्र बोरसे यांनी सावदा पोलीस स्टेशनला माहिती दिली. यानुसार पथक आणि ए. पी. आय. देविदास इंगोले, पी.एस.आय. राजेंद्र पवार व समाधान गायकवाड, पो.हे.कॉ. मनोज हिरोळे, संजय चौधरी, ममता तडवी, यशवंत टहाकळे यांच्यासह सहकार्यांनी आज दुपारी ही कारवाई केली.
या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील गावठी कट्टा आणि जीवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.