जळगाव तालुक्यातील खेडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खेडी येथे राहणाऱ्या तरूणाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दि. २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता उघडकीस आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पंकज जगन सपकाळे (वय ३० रा. खेडी ता.जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. फायनान्स कंपनीत काम करून उदरनिर्वाह करत होता.(केसीएन)सायंकाळी आईवडील हे खालच्या खोलीत बसलेले असतांना पंकज सपकाळे याने वरच्या खोलीत जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश वंजारी हे करीत आहे.