पाचोरा ( प्रतिनिधी )– जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्या प्रयत्नातुन मंजूर झालेल्या खेडगाव नंदीचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचा भुमिपुजन सोहळा आज आयोजित करण्यात आला होता.
जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील व औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोद्याचे आदर्श माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांची प्रमुख पाहुने म्हणून यावेळी उपस्थिती होती आ.किशोर पाटील व आ.गिरीश महाजन यांच्या हस्ते नव्या इमारतीचे भुमिपुजन करण्यात आले एच बी संघवी हायस्कुल , खेडगाव ( नंदीचे ) येथे हा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता
याप्रसंगी आदर्श गाव पाटोदा येथील माजी सरपंच भास्ककराव पेरे पाटिल यांचे ग्रामीण विकासात गावाची भूमिका या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी जि.प.सदस्य पदमबापू पाटील , मधू काटे , रावसाहेब जिभाऊ, दिकपसिंग राजपूत, भूराआप्पा पाटिल, अनील महाजन , शिवसेनेच्या .अस्मिता पाटील , प्रांताधिकारी डाँ. बादँल , तहसिलदार चावडे , गटविकास अधिकारी पाटिल , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .वाघ व विविध विभागातील अधिकारी , पदाधिकारी, परिसरातिल सरपंच , सदस्य , नंदिकेश्वर युवा फाऊंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते
सूञसंचालन प्रा.यशवंत पवार व महेश कौंडिलेसर यांनी केले आभार प्रविण ब्राम्हणे यांनी मानले.