जळगाव (प्रतिनिधी ) ;- गेल्या काही दिवसांपासून जळगाव महापालिकेतील राजकारण तापू लागले असून आज माजीमंत्री एकनाथराव खडसे यांची जळगावातील मुक्ताई बंगल्यात शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन आणि विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास भेट घेऊन बंदद्वार चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. याप्रसंगी माजी आ. गुरुमुख जगवाणी , अभिषेक पाटील, अशोक लाडवंजारी आदी उपस्थित आहे. याबाबत एकनाथराव खडसे हे थोड्याच वेळात पत्रकारांशी संवाद साधणार असून ते काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.