पारोळा (प्रतिनिधी) – क्षयरोग नियंत्रण सप्ताहांत जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार १९० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले .
रुग्ण शोध मोहीम जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया , जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजिराव चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. इरफान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात यशस्वी करण्यात आली.
जिल्हा समन्वयक किरण निकम यांनी सांगितले की, या मोहिमेअंतर्गत 279 टीमच्या माध्यमातून व पारोळा येथील सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्था मिळून 5 लाख 58 हजार 190 नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली. 4637 संशयित रुग्ण आढळले जिल्ह्यात 125 बाधित रुग्णांवर औषधोपचार केला जाणार आहे.
क्षयरोग शोध मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 15 तालुक्यात 77 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा सेविकाच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात आली.डीपीएस व्हि.बी पाटील ,संजय पाटील, नितीन मुळे यांनी सहकार्य केले.
चार वर्षापासून कुटीर रुग्णालय पारोळा अंतर्गत सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील व सचिव आशा पाटील व त्यांचे सहकारी क्षयरोग निर्मूलन शोधमोहिमेत सहभाग घेत आहेत पारोळा शहरातील राजीव गांधी नगर, इंदिरा नगर, विटभट्टी, पेट्रोल, फटाका फॅक्टरीवरील कामगार यांची 2321 जणांची तपासणी करीत 240 गृहभेटीत संशयित 95 तर बाधित 2 जण आढळून आले.पारोळा तालुक्यात 15 टीमच्या माध्यमातून 13 रुग्ण बाधित आढळून आले.
या मोहिमेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश साळुंखे, डॉ.प्रांजली पाटील , डॉ.स्वप्नील जाधव, डॉ. तुषार पाटील, डॉ. राहुल पवार, डॉ. देवयानी शिंदे, डॉ. सी आर देसले , आरोग्य सहाय्यक आर.जे सातपुते, तालुका पर्यवेक्षक ज्ञानेश्वर पाटील ,तालुका लेखापाल भुषण पाटील, वरिष्ठ पर्यवेक्षक भगवान चौधरी, मलेरिया तालुका पर्यवेक्षक डी.बी. राजहंस, प्रयोग शाळा पर्यवेक्षक राजेंद्र चंद्रात्रे, सुमित शेलकर, अनिल वाणी, राजू वानखेडे, दीपक सोनार, भुषण पाटील, भुषण पाटील, प्रसाद राजहंस यांनी सहकार्य केले.