भुसावळ ( प्रतिनिधी ) – साकेगाव येथील तरूणाला खंडणी मागण्याच्या गुन्ह्यातील दोन संशयितांना भुसावळ तालुका पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली आहे.
महामार्गावरच्या बर्हाटे पेट्रोल पंपाजवळ बंटी पथरोड यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर फाडल्याच्या आरोप करत मयूर मदन काळे (वय १९, रा.साकेगाव) याचे संशयितांनी चारचाकीतून अपहरण केले. चॉपर व पिस्तुलाचा धाक दाखवून ५ लाख रुपये खंडणी देण्याच्या अटीवर सोडून दिले होते. ७ व ८ सप्टेंबरला घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती.
मयूर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंटी पथरोड, नितीन कोळी (अंजाळे, ता.यावल), हर्षल पाटील, गोलू कोटेचा (साकेगाव), ओम, सागन भोई (वय २८, रा.भोईनगर, भुसावळ) यांचेवर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात प्रारंभी सागर भोई यास अटक करण्यात आली होती.
काल नितीन तायडे (रा. अंजाळे, ता.यावल) व हर्षल पाटील (रा. वाल्मीक नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. सपोनि गणेश धुमाळ, अमोल पवार यांचेसह हवालदार रवींद्र बिर्हाडे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, नीलेश चौधरी, रमण सुरळकर, बंटी कापडणे, प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश माळी यांनी कारवाई केली.