मुंबई (प्रतिनिधी) :- ईशान खट्टर आणि अनन्या पांडे अभिनीत ‘खाली पिली’ हा मनोरंजनाचा मसाला असलेला चित्रपट आज रिलीज झाला आहे. सुट्टीच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी जर आपण चित्रपट पाहण्याचा विचार करीत असाल तर हा रिव्ह्यू तुम्ही जरुर वाचायलाच हवा. ईशान अनन्याच्या नव्या जोडीचा मजेदार मुंबईची भाषा आणि पैशाच्या बॅगचे रहस्य मांडणारा, हा चित्रपट पूर्णपणे बॉलिवूड मसाला मनोरंजन करणारा चित्रपट आहे.
‘खाली पिली’ चित्रपटाचे कथानक सुरु होते, मुंबईतील टॅक्सी चालकांचा संप सुरु आहे तेथून, त्यामुळे रात्री टॅक्सी चालविणारा एक ड्रायव्हर ब्लॅकी म्हणजे इशान खट्टर या संपाचा फायदा घेऊन पॅसेंजरांकडून जादाचे पैसे वसुल करत असतो. अधिक पैशांच्या मोहापायी तो पूजा म्हणजे अनन्या पांडेला आपल्या टॅक्सीत बसवतो आणि इथूनच सुरु होते वेगवान रहस्याची गोष्ट. ब्लॅकी स्वतःच टॅक्सी युनियनमधील एका ड्रायव्हरचा हाफ मर्डर करून पळून आलेला आहे. या कथानकात पूजा आणि ब्लॅकी यांचे काय कनेक्शन आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हांला हा चित्रपटच पहावा लागेल. ‘खाली पिली’ एक फुल ऑन मसाला चित्रपट आहे. धडाकेबाज ॲक्शनसोबतच लटके झटके दाखविणाऱ्या गाण्यांपर्यंत सर्व प्रकारचे फ्लेवर या मसाला चित्रपटात आहेत. चित्रपटाचे कथानक एका रात्रीत घडते, चित्रपटाच्या अखेरीस दिवस उजाडतो. त्यामुळे जास्त काळाचे कथानक नाही. या चित्रपटाचा प्लस पाईंट आहे तो म्हणजे ईशान आणि अनन्या ही फ्रेश जोडी. या दोघांचा सोबत पहिलाच चित्रपट असून, ते दोघेही आपल्या अभिनयाने हा चित्रपट मनोरंजक करतात. चित्रपट पाहतांना धमाल येते. मात्र कथानकात घडणाऱ्या घटनांचे लॉजिक लावत बसल्यास या चित्रपटाचा आनंद मात्र तुम्हांला घेता येणार नाही.हा चित्रपट सिनेमागृहातील मोठ्या पडद्यासाठी दिग्दर्शक मकबूल खान यांनी बनविला होता. पण कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावा लागला आहे. सदाबहार गाणी, चटपटीत संवाद आणि धडाकेदार ॲक्शनमुळे सिंगल स्क्रीन सिनेमाचे प्रेक्षक हा चित्रपट खरच एन्जॉय करु शकतील.
मध्यंतरानंतरच्या भागात अचानक अनेक गोष्टी घडण्यास सुरुवात होते. ब्लॅकी आणि पूजा ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यामुळे जत्रेत जातात आणि पोलिसांपासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतात पण दुसऱ्या क्षणी स्टेजवर नाचू लागतात. लॉजिकचा विचार करणे सोडले तर मध्यंतराच्या आधीचा भाग मजेदार आहे. खास बॉलिवूड मसाला चित्रपटाची ढिशूम ढिशूम बघणाऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. ईशान आणि अनन्या या नव्या जोडीसाठी तरी हा चित्रपट हमखास एकदा तरी बघायला हवा असाच आहे.
दिग्दर्श – मकबूल खान
संगीत – विशाल-शेखर
कलाकार – ईशान खट्टर, अनन्या पांडे, जयदीप अहलावत, अनूप सोनी, सतीश कौशिक, स्वानंद किरकिरे.
⭐⭐⭐⭐