मुंबई (वृत्तसंस्था) – मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.


भाजप पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी २३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पत्नी, मुलगी व ७२ समर्थकांसह प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर भाजप पक्षाच्या बंडखोर आमदार गीता जैन यांनी शनिवारी २४ रोजी मुंबईत मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मीरा- भाईंदर मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन यांनी भाजपमध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढवली होती. भाजपच्या त्या माजी महापौर होत्या. त्यामुळे गीता जैन यांच्या पक्षांतरानंतर भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. दरम्यान, गीता जैन यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामुळे मीरा- भाईंदर या भागातील शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.







