चाळीसगाव ( प्रतिनिधी ) ;- चाळीसगावात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा व अवैध दारूसोबत अनेक दोन नंबरचे धंदे असून याला लोकप्रतिनिधींचा वरदहस्त आहे. हे धंदे बंद केल्यास अनेक जण थंड होतील अशी घणाघाती टीका आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली . प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी चाळीसगाव शहरात परिवार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

एकनाथराव खडसे म्हणाले की, चाळीसगावात अवैध गुटखा, अवैध दारू आदींसह अनेक दोन नंबरचे धंदे जोरात सुरू असून याला लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळत आहे. पोलीस यावर कारवाई करत असून कठोर कारवाई झाल्यास अनेक जण थंड पडणार असल्याचे प्रतिपादन खडसे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाले असून आगामी निवडणुकांमध्ये याला कायम ठेवायचे असल्यास राज्य सरकारने केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन त्यांनी केले. संघटनाच्या बळावरच आपला पक्ष प्रगतीपथावरून जाणार असल्याचा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.







