निंभोरा पोलिसात तक्रार दाखल
खिर्डी ता. रावेर (प्रतिनिधी ) रावेर तालुक्यातील कांडवेल शेत शिवारात अज्ञात व्यक्तींकडून केळीचे झाड कापून फेकल्याची घटना दि १६ ते १८ जानेवारी दरम्यान घडली. कांडवेल येथील रहिवासी ईश्वर सुरेश पाटील वय २३ यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या मालकीच्या कांडवेल शेत शिवार गट नं १७३ मध्ये असलेल्या उभ्या केळीचे सुमारे १५० झाड अज्ञातांनी कापून फेकले.या घटने ने गावात खळबळ उडाली.या घटने वरून निंभोरा पोलिसात सदर फिर्यादीने फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.