रावेर-यावल तालुक्यात तापमानाचा पारा ४५ आल्याने चिंता
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : एप्रिलची चाहुल लागताच तालुक्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ च्या वर गेल्याने निसवनी व कापणीवर असलेल्या केळी बागांवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून धावपळ सुरू आहे. केळी वाचविण्यासाठी अनेक उपाययोजना शेतकऱ्यांकडून आखल्या जात आहे.
त्यात प्रामुख्याने पाण्याची पाळी वेळेवरच देणे, गरम हवा बागेत जाऊ नये म्हणून नेटचा वापर करून बागेच्या चतुःसीमा बंद करणे तसेच तऱ्होटा व गुरांचा घास नावाची वनस्पती लाऊन बाग सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील जूनमध्ये केळी लागवड झालेल्या बागा आता निरवणीवर आहेत. काही परिपक्व होण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत. पुर्वी या भागात दोनच वेळा लागवड केली जात होती . मृग नक्षत्रात लागवडीला मृग बाग म्हणायचे आणि ऑगस्टच्या लागवडीला कांदे बाग म्हणून संबोधीले जात होते.
आता तर ४ वेळ लागवड केली जाते. इतर राज्यात केळाची लागवड वाढल्याने आता सर्वत्र उत्पादन घेतले जात आहेत. म्हणुन केळीची लागवड आता ४ वेळा केली जाते. आघादबाग, राम बाग, कांदेबाग, मृगबाग अशा प्रकारे जिल्हाभरात लागवड केली जाते. चांगल्या प्रकारे भाव मिळावे म्हणून म्हणून शेतकरी आपल्या आवडनुसार लागवड करतात. लाखो रुपये खर्च करून महागडे रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर करून उभे केलेली केळी बागा तापमानाच्या पाऱ्यांने जळत आहेत. अनेक उपाययोजना करून आपल्या केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत .