पालकमंत्री गुलाबराव पाटील दिल्लीत तळ ठोकून, प्रशासनाशी सातत्याने घेताहेत माहिती
जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील माळी वाडा परिसरातील १३ तरुणांसह टेम्पोचालक हे केदारनाथ व इतर ठिकाणी उत्तर भारतात दर्शनासाठी गेले आहेत. मात्र आता तेथील आपत्तीमुळे त्यांचा गावातील नातेवाईकांशी संपर्क तुटल्याने पाळधी गाव चिंतातुर झाले आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे तातडीने दिल्लीला रवाना झाले असून प्रशासनाशी संपर्क साधून सातत्याने माहिती मिळवीत आहेत.
पाळधी गावातील तरुण हे दि. २७ जुलै रोजी पाळधी येथून टेम्पो ट्रॅव्हलर (क्रमांक एमएच १९, सी वाय २२०२) ने निघाले आहेत. शेवटचा संपर्क दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी झाला होता.(केजीएन)त्यानंतर त्या युवकांचा संपर्क आता पर्यंत होऊ शकत नसल्यामुळे त्या युवकांचा परिवार चिंताग्रस्त आहे. माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कळल्याने ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. पालकमंत्री हे आपतकालीन कक्ष यांच्याशी सतत संपर्क साधत आहे.
पालकमंत्री हे बुधवारी रात्री दिल्लीहुन उत्तर काशी येथे रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर तरुणांच्या संपर्कासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील सातत्याने प्रयत्न करीत आहे.(केजीएन)रोहन दिनेश माळी, रोहित बंडू माळी, मनोज संजय चौधरी, ज्ञानेश्वर संजय माळी, दिपक रत्नाकर सोनार, संघदीप भारत नन्नवरे, दीपक माळी, वैभव गंगावणे, संदीप माळी, विशाल पाटील, रिंकेश खुशाल माळी, भूषण सुरेश माळी, पवन माळी असे या १३ तरुणांची नावे आहेत.