जळगाव ( प्रतिनिधी ) – एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाने आज रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास तांबापुरा भागात एका केबलचोराला अटक केली आहे .
सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, हे.काँ. अल्ताफ पठाण , पो.ना. सचिन पाटील, पो. काँ. इम्रान बेग हे तांबापुरा परीसरात पेट्रोलींग करीत होते त्यांना रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास बिलाल चौक, तांबापुरा, भागात दोन इसम हिरो होंडा मोटारसायकल ( क्रमांक एम.एच. 19 सि. एस. 1872 ) वर काहीतरी घेवुन जातांना दिसले त्यांना इशारा देताच मागील इसम गाडीवरून उडी मारून पळून गेला. त्याचा पाठलाग केला, परंतु तो मिळुन आला नाही. मोटारसायकल चालविणाऱ्याकडे पिशवीमध्ये काळ्या रंगाची केबल मिळुन आली संशय आल्यावर पंचनामा करण्यात आला
चौकशीत त्याने नाव अविनाश युवराज तांबे ( वय 21 , रा. ग्रामपंचायत जवळ, दापोरा ) असल्याचे व त्याचेसोबतचा व्यक्ती दिपक नारायण सपकाळे ( रा. दोपोरा ) असल्याचे सांगीतले. त्याच्या ताब्यातून 9,000 रुपये किंमतीची 90 फुट लांबीची काळ्या रंगाची केबल मोटारसायकल जप्त करण्यात आली . ही केबल दापोरा गावातुन जाणा-या सुरत रेल्वे लाईन पुलाजवळच्या केबलमधुन तोडुन चोरुन मी व दिपक सपकाळे जळगाव येथे भंगार दुकानावर विक्री करण्यासाठी आलो होतो असे त्याने सांगीतले सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, हे.काँ. अल्ताफ पठाण , पो.ना. सचिन पाटील, पो. काँ. इम्रान बेग यांनी ही कारवाई केली.