जळगाव (प्रतिनिधी) – अजिंठा विश्रामगृह जळगाव येथे काल दि. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी विलास आठवले उपसचिव विधान मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई तथा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय मार्गदर्शक यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर व शिष्टमंडळ समवेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.


त्यानंतर जिल्हा परिषद मधील सर्व विभागाच्या कर्मचा-या अडी-अडचणी व आरोग्य (आश्वासित प्रगती योजना अंतर्गत 10,20,30 वर्षे कालबद्ध पदोन्नती, नेहमीच उशिराने होणारे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मासिक पगार, आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, भविष्य निर्वाह निधी प्रकरण, प्रलंबित वैद्यकीय बिले इत्यादी,) त्याचप्रमाणे शिक्षक व जि प कर्मचारी यांचे वेतन,पदोन्नती, प्रलंबित प्रश्न सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित्र आहिरे, सूत्रसंचालन बी ए पानपाटील तर आभार मिलिंद लोणारी यांनी केले. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे सर्व पदाधिकारी खालील प्रमाणे उपस्थित होते.
अनील सुरडकर विभागीय अध्यक्ष नाशिक, सुनील सोनवणे जिल्हाध्यक्ष महासंघ,संदीप केदारे जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना, मिलिंद बागुल,जिल्हाध्यक्ष जि प आर टी सोनवणे, कैलास तायडे मा.सभापती भुसावळ सोसायटी. बी ए पानपाटील, रमेश सोनवणे, रमेश थाटे, संजय ठाकूर, जे बी नन्नवरे, मिलिंद लोणारी, शेषराव पाटील, धीरज तायडे, मोहन टेमकर, भटराम शिरसाट, विजय संदांशिव, डॉ.प्रदीप सुरवाडकर, किशोर नरवाडे, मूलचंद पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.







