जळगाव (प्रतिनिधी) – काशिनाथ चौकातील हॉटेलात जेवणासाठी गेलेल्या तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,अजय शालीक ब्राम्हणे (वय-२७) रा. कौतीक नगर, आयोध्या नगर हे वेल्डिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कामासाठी त्यांच्या मेहुण्याची (एमएच १९ बी ५५८६) क्रमांकाची दुचाकी गेल्या पाच महिन्यांपासून वापरतात. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास मावसभाऊसोबत एमआयडीसी परिसरातील हॉटेल अंबरनाथ येथे जेवणासाठी दुचाकीने गेले. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी लंपास केली. सव्वा पाच वाजता जेवण करून घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले असता दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी इतरत्र विचारपूस केली असता मिळून आली नाही. अजय ब्राम्हणे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.