जळगाव (प्रतिनिधी ) ;– शैक्षणिक वर्ष 2021- 22 या वर्षातील पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. यासाठी इयत्ता पहिली ते दहावी या वर्गातील पालकांना यासाठी आपले नाव देऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार इच्छुक असणाऱ्या पालकांची सभा घेऊन लकी ड्रॉ पद्धतीने पालकांची निवड करण्यात येऊन या संघाची स्थापना करण्यात आली . कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे प्राचार्य अमितसिंह भाटिया, पालक श्री व सौ शिरसाठ,शाळेच्या समन्वयिका संगीता तळेले’, स्वाती अहिरराव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले . संगीत शिक्षिका, स्वाती देशमुख यानी गीत सादर केले. यामध्ये निवड झालेल्या पालकांची ची नावे पुढील प्रमाणे अरुणा होलणार, लक्ष्मीकांत कांबळे , वैशाली नाईक, प्रमोद नारखेडे , तृप्ती तोडकरी , मनीषा पोकळे , सोनू पॉल ,अंजली भोसले , उमेश वाणी , जयश्री पाटील .निवड झालेल्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा भिडे यांनी केले तर प्रास्ताविक स्वाती अहिरराव यांनी केले शाळेचे प्राचार्य अमितसिंह भाटिया यांनी पालकांशी संवाद साधला तर लक्ष्मीकांत कांबळे, उमेश वाणी , सौ. मनीषा पोकळे या पालकांनी आपलें मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू निलेश बडगुजर व अनिरुध्द डावरे यांनी सांभाळली .या कार्यक्रमासाठी माधुरी पाटील, भारती माळी ,शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.