जळगाव शहरातील कासमवाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कासमवाडी परिसरातील एका तरुणीने आजाराला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
अश्विनी प्रकाश पाटील (वय १८, रा.कासमवाडी, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती कासमवाडी मध्ये आई, वडील, दोन भाऊ यांच्यासह राहत होती. अश्विनीचे वडील प्रकाश पाटील हे खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. (केसीएन) तर अश्विनी ही शिक्षण घेत होती. काही दिवसांपासून अश्विनीला दुर्धर आजार जडला होता. त्यामुळे ती त्यातून तणावात होती.
दरम्यान शनिवारी दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी घरी कोणी नसताना अश्विनीने राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली.(केसीएन)दरम्यान कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी अश्विनीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन देवचे यांनी तिला तपासून मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती जाणून घेतली. तर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.