जळगाव ( प्रतिनिधी ) – नियमबाह्यपणे प्लॅस्टिकच्या पिशव्या विकणाऱ्या दुकानदारावर काल सायंकाळी महापालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई केली . या पिशव्यांचा साठा जप्त करीत त्याला दहा हजार रुपये दण्ड आकारण्यात आला.
काल संध्याकाळी शहरातील लोकेश ट्रेडर्सचे ( कोंबडी बाजार रोड) मालक कैलास कोळी यांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा आढळून आला तो साठा जप्त करण्यात आला असून वजन अंदाजे १८० किलो आहे. या दुकानदारास १०,००० रुपये दंड करण्यात आला.
ही कारवाई मनपाचे आरोग्य निरीक्षक जितेंद्र किरंगे व सहकारी संजय बागुल यांनी सहाय्यक आयुक्त पवन पाटील व मुख्य स्वच्छता निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केली