पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथील घटना
शिवनारायण उर्फ कांतीलाल आत्माराम पाटील (वय ४२, रा. सावखेडा होळ) यांनी खबर दिली आहे. सचिन विनोद पाटील (वय २५) याने दि. ३० रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याचे राहते घरात छतावरील स्लॉपमध्ये असलेल्या लोखंडी हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यास रुग्णवाहिकेमध्ये टाकून पारोळा येथील कुटीर रुग्णालय पारोळा येथे उपचाराकरिता दाखल केले असता तेथे डॉ. गणेश पोले यांनी तपासून मयत घोषित केले.
त्याच्यावर सोसायटीसह इतर कर्ज असल्याने त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याबाबत पारोळा पो.स्टे.ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ.डॉ. शरद पाटील हे करीत आहेत.