पारोळा शहरात चोरवड रोडवरील घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- येथील देवी पद्मावती नगर चोरवड रोड येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना दि. ६ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात बालु भिला भोसले यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दशरथ हिलाल महाडीक (मराठे, वय ४२ वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. परिवारासह ते राहत होते. शेती तसेच गवंडीकाम करून ते उदरनिर्वाह करीत होते. त्याचेवर फायनन्सचे कर्ज होते. सततची नापिकीमुळे ते आर्थिक विवंचनेत होते. दि. ५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात काम करून घरी आले.(केसीएन)त्यांनतर सांयकाळी ७ वाजेच्या सुमारास आर्थिक विवंचनेतून दशरथ यांनी त्याच्या रहात्या घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आला. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.