अमळनेर (शहर प्रतिनिधी) – तालुक्यातील पडासदळे येथील मूळचे रहिवासी गणेश पाटील सध्या प्रताप मिलकम्पाउंड अमळनेर येथे राहतात. हे भारतीय सैन्य दलातून प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले म्हणून सत्कारसमारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गणेश पाटील यांचा प्रताप मिलकम्पाउंड येथे भव्य सत्कार करण्यात आला.


अमळनेर माजी सैनिक संघटनेचे सर्व माजी सैनिक व सत्कारार्थी गणेश पाटील
त्या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व माजी सैनिक उपस्थित होते. झालेल्या सत्कार समारंभात प्रथम गणेश पाटील यांच्या विषयी त्यांच्या मित्रांनी आठवणी सांगितल्या. सत्कारा नंतर गणेश पाटील यांनी आपल्या मनोगतात आलेले आईवडील व भाऊ यांच्या प्रयत्नाने भारतीय सैनिकात भरती झालो असे सांगितले.पुढे जुलै २००२ ते जुलै २०२१ काळ कसा पूर्ण केला, त्यात त्यांनी पुणे येथील ट्रेनिंग, कशी पूर्ण केली. त्यानंतर युनिट १०६ इंजिनिअर, रेजिमेंट (बॉम्बे इंजिनिअर) युनिच्या माध्यमातून आसाम , राजस्थान, अरुणाचल प्रदेश, झाशी, हिमाचल प्रदेश, नागालंनू, सिक्कीम येथे आपली देशसेवा पूर्ण केली.विविध राज्यात सेवाकरीत असताना तेथील वेगवेळ्या संस्कृती दर्शनव अनुभव सांगितले. यावरच न थांबता ३ वर्ष शांतीसेनेत आफ्रिका व सुदान येथे राहिलो तो अनुभव निराळाच होता असे सांगितले.
पडासदळे व प्रताप मिल कम्पाउंडवासीयांचे आभार मानले. माजी सैनिकांनमधुन मेजर अण्णा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी आम्हाला सेवानिवृत्त नंतर सर्व माजी सैनिकांना खूप वेगवेगळ्या समस्या असतात. त्या प्रशासनाने सोडवाव्यात. आ. अनिल दादा, साहेबराव दादा, मा. स्मिताताई, शिरिषदादा यांना आवाहन केले. आम्हाला अमळनेरात माजी सैनिकांना अद्ययावत सभागृह बांधून मिळावे हि मागणी केली. त्यावेळी तालुक्यातील सर्व माजी सैनिक उपस्थित होते. त्यात माजी सैनिकसंघटनेचे अध्यक्ष सुभेदार बळीराम वानखेडे, कार्याध्यक्ष राजेंद्र यादव , सर्व सभासद जितेंद्र सोनवणे, जगदीश पाटील, रउफ पठाण, पंकज पाटील, भूषण पाटील, नरेंद्र पाटील, नितीन चौधरी, गुलाब पाटील, लोटन बडगुजर, दिनेश पाटील, राजेश पाटील , योगेश पाटील, विशाल पाटील, रमेश पाटील, जितेंद्र पाटील, समाधान पाटील, विकास महाले, चंद्रकांत पाटील , रवींद्र जाधव, समाधान पाटील ,किशोर पाटील, एकनाथ पाटील, शामकांत भदाणे व माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या भावपूर्ण कार्यक्रमात त्यांची आई चांदबाई, पत्नी शैलाबाई, भाऊ राजेश, मुली मोहिनी , हेतल उपस्थित होते.कार्यक्रम सूत्रसंचालन मेजर अण्णा यांनी केले. तर आभार भाऊ राजेश पाटील यांनी मानले.







