चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बहाळ येथे दोन दिवसांपूर्वी एरंडोल-येवला महामार्गावर कार व दुचाकीत भीषण अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये जखमी झालेल्या वृद्धाचा शनिवारी मृत्यू झाला.
वासुदेव हरी वाणी (६४) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे. दोन दिवसांपूर्वी वासुदेव वाणी हे दुचाकीवर जात होते. त्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या कारने धडक दिली. या अपघातात वासुदेव वाणी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना धुळे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.