भुसावळ तालुक्यातील दीपनगर महामार्गावरील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- शहराजवळील दीपनगर महामार्गावर वरणगावकडून भुसावळच्या दिशेने येत असताना कारची ट्रकला जोरदार धडक बसली. यात कारमधील पाच जण जखमी झाले असून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळाली.
ही घटना मंगळवारी ३ वाजेच्या सुमारास घडली. कार क्रमांक (एम. एच. १९ ई.ए. ३८७६) मंगळवारी दुपारी वरणगावकडून भुसावळच्या दिशेने येत असताना त्याच वेळेस समोर जात असलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक लागली. कारच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारमधून प्रवास करीत असलेले ५ जण जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आले आहे.