पाचोरा तालुक्यातील भोजेजवळची घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- भरधाव टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक बसून दुचाकीवरील दोघ भावांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना भोजे दरम्यान घटना घडली आहे. टेम्पो चालकाविरुद्ध पिंपळगाव हरे. पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दि. २५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास संदीप उत्तम पाटील आणि दिलीप उत्तम पाटील हे दोन्ही भाऊ दुचाकी क्रमांक (एम.एच. ५४, ए. ४८९) ने वरखेडीहून भोजे गावाकडे जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या मालवाहतूक वाहन क्रमांक (एम.एच. १९, सी.वाय. ८६६६) ने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालक दिलीप पाटील हा रस्त्यात दगडावर पडला. त्याच्या डोक्याला मार लागला. यावेळी तत्काळ ग्रामस्थानी टेम्पो चालकाला पकडले. त्याचे नाव सुनील गुलाबराव पाटील असे त्याने सांगितले. त्याच्या मदतीने दिलीप पाटील यास पाचोरा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. संदीप पाटील याने फिर्याद दिल्यावरून टेम्पो चालक सुनील पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.