जळगाव ( प्रतिनिधी ) – चारचाकी शिकणार्या चालकांकडून कारचा दुचाकीला कट लागल्यानंतर दोन गटांमध्ये मोहाडी रोडवर आज हाणामारी झाली. या हाणामारीतल्या दोन्ही गटातील जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात दाखल करण्यात आले तेथेदेखील दोन्ही गटांमध्ये जुंपल्याने तणाव वाढला होता.
आज दुपारी मोहाडी रोडावर चारचाकी शिकणार्या तरूणाच्या कारचा एका दुचाकीला कट लागला. दुचाकीस्वार मोहाडी येथील रहिवासी होता. कट लागल्यानंतर कारमधील तरूण आणि दुचाकीस्वाराने फोन करून आपापल्या मित्रांना बोलावले. यामुळे मोहाडी रोडवर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.
या हाणामारीत जखमी झालेल्यांना जिल्हा रूग्णालयात आणले असता तेेथेदेखील दोन्ही गटातील तरूण एकमेकांना भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले. या वेळी मोहाडीचे सरपंच धनंजय उर्फ डंपी सोनवणे यांनी दोघ गटात मध्यस्ती करून वाद मिटविला. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे दोन्ही गट शांत झाले असले तरी परिसरात तणाव आहे.
दरम्यान, जिल्हा रूग्णालयात दोन्ही गटातील लोकांनी मोठी गर्दी केली आहे. या हाणामारीमध्ये आदील शेख शकील, आतीक शेख आणि सौरभ नन्नवरे हे तीन जण जखमी झाले आहेत.पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.