पारोळा ( प्रतिनिधी ) – सुसंस्कृत समाजनिर्मिती व सुजाण नागरिक घडविण्यासाठी पुस्तक , ग्रंथ वाचन करणे व तशी आवड निर्माण करणे काळाची गरज आहे . व्हाट्सअँप पाहण्यापेक्षा पुस्तके वाचा, असे प्रतिपादन पारोळाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांनी केले . स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे लोकार्पण व ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते .
स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे लोकार्पण व ग्रंथप्रदर्शन उद्घाटन आदर्श शिक्षक स ध भावसार यांनी केले . ग्रंथ, ग्रंथालय हे समाजमनासाठी आदर्श ठरतात, ग्रंथ जीवनातील तिसऱ्या स्थानावरील गुरु आहेत, पारोळा नगरपालिकेस अधिकारी व पदाधिकारी अभ्यासू मिळाले आहेत, त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज हा कार्यक्रम घडून आला आहे असे भावसार यांनी सांगितले.
या प्रसंगी बंडूनाना वाणी, सौ विजया वाणी , सौ शुभांगी मोहरीर , माजी ग्रंथपाल शिंपी, बीटीव्हीचे संपादक दीपक भावसार यांनी मनोगत व्यक्त करून नगरपरिषदेचे आभार व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकात महाजन यांनी केले आभार मुख्याधिकारी सौ ज्योती भगत यांनी मानले.