• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कापूस खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी खानदेशात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2021
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – सोयाबीनच्या दरामध्ये घट होत आहे व कापसाच्या दरात वाढ होत आहे. हे दोन्हीही खरीपातील पिके उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची आहेत.कापूस खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी खानदेशात आले आहेत

मात्र, सोयाबीन मराठवाड्यात अधिकच्या क्षेत्रावर तर कापूसाचे उत्पादन खानदेशात जास्त प्रमाणात घेतले जाते. यंदा पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले तर आता कापसाला विक्रमी दर मिळत आहे. खानदेशातील कापूस घेण्यासाठी परराज्यातील व्यापारी दाखल होत आहेत. सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी धुळे, पाचोडा, चोपडा, जामनेर येथील शेतकऱ्यांना कापसाचा आधार मिळालेला आहे. येथील खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटलला 8250 चा दर मिळत आहे. मात्र, वातावरणात बदल होत असल्याने कापूस अधिकचा वेळ झाडाला न ठेवता त्याची वेळेत वेचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जिनिंग प्रक्रिया उद्योग सुरु झाल्याने कापूस खरेदीला वेग वाढलेला आहे. कापसाला दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खरीपातील इतर पिकांमधून शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असले तरी कापसाच्या दर स्थिर राहतील असा अंदाज आहे. यंदा मराठवाड्यात कापसाच्या क्षेत्रामध्ये घट झाली होती तर सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले होते. त्यामुळे कपाशीची मागणी वाढलेली असल्याने मुहूर्ताचे दर हे 10500 होते तर त्यानंतर आता 8200 दर कापसाचे दर हे स्थिरावलेले आहेत.

खानदेशात दिवसाकाठी 1 लाख क्विंटल कापसाची आवक होत आहे. या भागातील जिनिंग प्रक्रिया उद्योग सुरु झाल्याने कापसाला चांगला दरही मिळत आहे. कापसाचे हेच दर स्थिर राहतील तर डिसेंबर नंतर यामध्ये सुधारणा होणार आहे. त्यामुळे शेतकरीही सावध भूमिका घेत कापूस विक्रीला आणत आहेत. भविष्यात कापसाचे दर वाढणार असल्याने टप्प्याटप्पाने कापसाची आवक होईल असा अंदाज आहे.

यंदा कापसाचे उत्पादन कमी असल्याने तोडणीला सुरवात झाली की मागणीही वाढलेली आहे. कापूस खरेदीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधील मोठ्या खरेदीदारांचे एजंट खानदेशात दाखल झाले आहेत. अंकलेश्‍वर-बऱ्हाणपूर महामार्गालगत म्हणजेच तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल या भागांत कापूस दर अधिक मिळत आहेत. कारण या भागातून मध्य प्रदेश, गुजरातेत लवकर पोहोचणे शक्य आहे. भविष्यात कापसाचे दर वाढतील या आशेने शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विक्री करीत नाहीत. मागणी अधिक असल्याने परराज्यातील व्यापारी हे खानदेशात दाखल झाले आहेत.

मुहूर्ताच्या दरानंतर सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. मात्र, कापसाच्या बाबतीत हे उलटे होत आहे. मुहूर्ताच्या दरानंतरही हे दर टिकून आहेत. सप्टेंबरमध्ये सुरुवातीला 5200, सप्टेंबरच्या अखेरीस 6200 आणि ऑक्टोबरमध्ये 6500, 6800, 700 अशी दरात वाढ होत गेली ती अजूनही कायम आहे. गेल्या दोन – तीन दिवसांत भडगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा आदी भागांत कापसाची विक्री खेडा खरेदी 8250 रुपये प्रतिक्विंटल या दरात झाली आहे.


 

 

Previous Post

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

फेसबुकवरच्या मित्राकडून तरुणीवर बलात्कार ; नोकरीसाठी मुलाखतीला येण्याचा बहाणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फेसबुकवरच्या मित्राकडून तरुणीवर बलात्कार ; नोकरीसाठी मुलाखतीला येण्याचा बहाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026
संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon