जळगाव – भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडकेत झालेल्या अपघातात पिता पुत्र जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री खोटे नगरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ घडली. या घटनेतील फरार कंटेनर चालकाला आज पोलिसांनी अटक केली आहे.
नागेश्वर पवार (वय ३५ ) मुलगा कार्तिक नागेश्वर पवार वय ५ वर्ष, रा. पिंप्राळा या दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे.
घटनेननंतर नागरिकांनी कंटेनरची तोडफोड केली. आज दुपारी पोलिसांनी पसार झालेल्या कंटनेरचालक अर्जुनकुमार सिंग वय ६५ रा.कोलकाता यास अटक केली . याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.