चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – लोंढे येथील तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी कन्नड घाटातून चोरी झाली. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश राठोड (वय-२५ रा.लोणजे ता. चाळीसगाव ) हे कामानिमित्ताने २३ सप्टेंबररोजी दुपारी कन्नड घाटाच्या पहिला वळणावर त्यांनी दुचाकी (एमएच १९ डीएफ ५१६८) पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेले ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. गणेश राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे करीत आहे.







