• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कानळदा रस्त्यावर विचित्र अपघातात दोघे ठार, महिला गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2023
in Uncategorized
0

पाच जखमी, अनोळखीची ओळख पटेना !

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कानळदा गावाजवळील समर्थ शाळेनजीक झालेल्या विचित्र व भीषण अपघातात एका पौरोहित्य करणाऱ्या युवकासह अनोळखी तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवरील एक महिला तसेच रिक्षातील चालक व चार महिला प्रवाशी जखमी झाल्याची घटना सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. गंभीर जखमींवर खासगी व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

जळगाव ते कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता विचित्र अपघात झाला. महेश गोकूळ जोशी (वय-४०) रा. पिंप्री ता. धरणगाव हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीवाय ९९०३) ने कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दुचाकीवर अनोळखी महिला आणि २२ वर्षीय अनोळखी तरूणी बसलेले होते. कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोरून जात असतांना वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला कट मारला. यात दुचाकीस्वार महेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तिघे रस्त्यावर पडले.

तेवढ्यात जळगाव शहराकडून येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ८०७०) ने रोडवरील तिघांना चिरडले व रिक्षा देखील पलटी झाली. या रिक्षातील प्रवाशी विमलबाई चौधरी, मंगलाबाई चौधरी, सुनिता चौधरी, राधाबाई चौधरी आणि रिक्षा चालक रविंद्र भावलाल पाटील सर्व रा. आव्हाणे ता.जि.जळगाव हे जखमी झाले. यावेळी रस्त्यावर विचित्र अपघात झाल्याने काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती. खासगी स्कुलबसमधून दुचाकीवरील तीनही जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुचाकीवरील तिघा जखमींपैकी अनोळखी तरूणीचा दुपारी २ वाजता तर दुचाकीस्वार महेश जोशी यांचा संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अनोळखी महिला यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. अनोळखी महिला व मयत तरुणी यांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया अभियानातून आरोग्याची नांदी

Next Post

व्यसन न करण्याची विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी घेतली प्रतिज्ञा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

व्यसन न करण्याची विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी घेतली प्रतिज्ञा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज
1xbet russia

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

February 14, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon