धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धरणगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कंडारी येथे ५० रुपयाच्या उधारीवरून काका-पुतण्यामध्ये झालेल्या मारामारीत काकाला प्राण गमवावा लागला .
कंडारी येथे राजू मानसिंग भिल (वय २८) आणि भारत सुकडू भिल (वय ४४) या दोघांमध्ये 50 रुपयांच्या उधारीवरून काल रात्री शाब्दिक चकमक झाली. नंतर शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजुने काका भारत यांना जोराचा धक्का दिला. या धक्क्यात भारत गटारीत पडले. गटारीत पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसून रक्तस्त्राव झाला. भेदरलेला पुतण्या राजूने त्यांना नातेवाईकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भारत भिल यांना मृत घोषित केले. पुतण्या राजूविरुद्ध भादवि कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो नि शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि अमोल गुंजाळ हे करीत आहेत